सांडपाणी साचल्याने परिसरातील विहिरींचे पाणी दूषित : डेनेज वाहिनी तुंबण्याचा प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
कलामंदिरच्या जागेत बहुमजली व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. क्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी खोदाई करताना येथील डेनेज वाहिनीचे नुकसान झाल्याने नव्याने बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाच्या तळघरात सांडपाणी साचून तलावाचे स्वरुप आले आहे. तसेच परिसरातील विहिरीचे पाणी दूषित झाल्याची तक्रार होत आहे.
व्यापारी संकुलाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. पण या परिसरातील डेनेज वाहिन्या स्थलांतर करण्याचे काम हाती घेतले नाही. त्यामुळे जागेमधून जाणाऱया डेनेज वाहिन्यांचे वारंवार नुकसान होत आहे. पण सध्या व्यापारी संकुलाच्या उभारणीचे काम रखडले आहे. पण नुकसान झालेल्या डेनेज वाहिन्यांची दुरुस्ती केली नाही. परिणामी ड्रेनेज वाहिन्यांमधून सांडपाणी वाहत असल्याने संकुल उभारणीकरिता खोदलेल्या खड्डय़ाला व तळघराला तलावाचे स्वरुप आले आहे. खड्डय़ातील सांडपाणी पाझरत असल्याने शुक्रवार पेठ परिसरातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे.
आवश्यक खबरदारीकडे दुर्लक्ष
टिळकवाडी परिसरातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे घरांमध्ये सांडपाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. या परिसरातील डेनेज चेंबर तुंबले असून रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी डेनेज चेंबर ओव्हरफ्लो होत आहे. कलामंदिर परिसरातील समस्या कित्येक दिवसांपासून निर्माण झाली असून येथील डेनेज वाहिन्या स्थलांतराची गरज आहे. पण डेनेज वाहिन्या स्थलांतर करण्यापूर्वीच खोदाईचे काम हाती घेतल्याने समस्या निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटीकरिता विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत, पण नागरिकांना समस्या निर्माण होवू नये याकरिता आवश्यक खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी
डेनेज पाणी साचत असल्याने परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. याबाबतची तक्रार स्मार्ट सिटी कंपनीकडे करण्यात आली होती. दुरुस्तीचे केवळ आश्वासन देण्यात येत आहे. सध्या व्यापारी संकुलाच्या उभारणीचे काम रखडले आहे. दोन एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या इमारतीच्या संपूर्ण तळघरात सांडपाणी साचले आहे. हा परिसर दुर्गंधी पसरल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी स्मार्ट क्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. पण स्मार्ट व्यापारी संकुलाच्या तळघराला सांडपाण्याच्या तळय़ाचे स्वरुप आले आहे. मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकाऱयांनी व मनपा आयुक्तांनी कलामंदिर ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.









