अमरावती : खासदार रवी राणा आणि प्रहार सेनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये झालेल्या वाक्युद्धामुळे अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले होते. राज्यातील नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर खासदार राणांनी दिलगीरी व्यक्त केली. आज आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आमदार बच्चु कडू काय भुमिका घेणार याकडे संपुर्ण रज्याचे लक्ष लागून असतानाच आमदार कडू यांनी एक पाऊल मागे घेत नमती भुमिका घेतली. पण यापुढे आमच्या वाट्याला गेला तर पुन्हा माफी नाही असा इशारा त्यांनी खासदार रवी राणा यांना दिला.
आपल्य़ा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना प्रहारचे अध्यक्ष म्हणाले,”मी साडेतीनशे गुन्हे घेऊन महाराष्ट्रभर फिरतो आहे. प्रहारचा कार्यकर्ता सैनिकांसारख वागतो. सामान्यांसाठी महाराष्ट्राचा एकही कोपरा सोडला नाही. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही आमच्या वाट्याला येणाऱ्यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही” असे थेट आव्हान त्यांनी अप्रत्यक्षरित्या खासदार राणांना दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले “हे शक्ती प्रदर्शन नाही. आम्ही संख्या पाहीली नाही व्यवस्था पाहीली. यापुढे सहन नाही झालं तर सत्ता सोडून जाऊ पण विरोधकांना सोडणार नाही. मी ऊगाच गुहावटीला गेलो नाही. मोठ्या पक्षांनी काहीही केलं तर चालतं पण आमचा लहान पक्ष आहे म्हणून एव्हढी का चर्चा ? महात्मा गांधींना मानतो पण भगतसिंग आमच्या डोक्यात आहे. त्यामुळे पहीली वेळ असल्याने माफ करतो यापुढे पण यापुढे माफी नाही” असा इशारा त्यांनी खासदार राणा आणि आपल्या विरोधकांना दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








