नेतान्याहू यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना जीवे मारण्याची धमकी
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, संरक्षण मंत्री योव गॅलांट आणि लष्करप्रमुख हरजी हालेवी यांच्यासह 11 जणांची मोस्ट वॉन्टेड यादी जाहीर केली आहे. हिब्रू आणि इंग्रजी भाषेत ही यादी जाहीर करण्यात आली असून त्यात छायाचित्रांसह 11 जणांची नावे आहेत. या पावलांमुळे इराण आणि इस्रायलमधील वाढता तणाव आणखी वाढू शकतो. नुकतेच इराणने इस्रायलवर सुमारे 180 क्षेपणास्त्रे डागली होती. त्यापैकी अनेक क्षेपणास्त्रे इराणच्या हद्दीत अनेक शहरांवर डागण्यात आली. या हल्ल्यानंतर इस्रायलने उत्तर आणि दक्षिण भागात हाय अलर्ट जारी केला आहे.









