मुरगोड पोलिसांची कारवाई : मुरगोड: पोलिसांनी जप्प केले साहित्य
बैलहोंगल / वार्ताहर
सौंदत्ती तालुक्यातील सोपडल गावाहून यरगट्टीमार्गे बेळगाव बागलकोट रस्त्याकडे जाणाऱ्या एका व्यक्तीला रस्त्यात अडवून पैशांची मागणी करणाऱ्या सात आरोपींना मुरगोड पोलिसांनी अटक केल्याची घटना शनिवारी घडली.
सौंदत्ती तालुक्यातील नुग्यानट्टी गावचा नागाप्पा निंगाप्पा रंगण्णावर (वय 26), बाळेशी महादेव होंडप्पनावर (वय 22), श्रीशैल विष्णू होंडप्पनावर (वय 22), गोकाक तालुक्यातील खनगाव गावचा रमेश यल्लाप्पा चंदरगी (वय 23) बंदेनवाज मेहबूबसाब अत्तार (वय 34), बैलहोंगल तालुक्यातील मास्तमर्डी गावचा मल्लाप्पा उदाप्पा कोमार (वय 24), मुडलगीचा इम्रान कुत्तुबुद्दिन मुल्ला (वय 21) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 60 हजार रोख रूपये, एक चावू, 6 मोबाईल व पाच लाखांची कार पोलिसांनी जप्त केली आहे.
डिसेंबर 2 रोजी एक व्यक्ती सोपडलहून यरगट्टीकडे जाताना कारमधून आलेल्या सातजणांनी त्यांचे अपहरण करून नेसरगी गावाजवळ असलेल्या राजनकट्टी डोंगरात घेऊन गेले व त्याठिकाणी त्याला 10 लाख रूपयांची मागणी केली. रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्या व्यक्तीने मुलाला निनावी फोनने माहिती देताच मुलाने पोलिसांत तक्रार दिली. यावेळी रामदुर्गचे डीवायएसपी रामनगौड हट्टी यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय मौनेश्वर माली व प्रोबेशनरी पीएसआय बसनगौड नेरली व इतर पोलिसांनी सापळा रचून वरील आरोपींना पकडण्यात यश मिळविले. मुरगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.









