रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी तीव्र पडसाद : विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे दिवसभर आंदोलन,आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने वाहतूक ठप्प,कर्मचारी, विद्यार्थ्यांसह प्रवास करणाऱ्या सर्वांचे झाले हाल
पणजी : समाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर गुरुवारी दुपारी करंजाळे येथे झालेल्या सशस्त्र हल्ल्याचे संपूर्ण गोव्यात तीव्र पडसाद उमटले असून या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ला गजाआड करुन त्याच्यासह अटक केलेल्या सर्व हल्लेखोरांवर ‘रासुका’खाली कारवाई करण्याची जोरदार मागणी आंदोलकांनी काल शुक्रवारी दिवसभर सुरु ठेवली. त्यानंतर रात्री पोलिसांनी सांताव्रुझ व कळंगुट येथून आणखी दोघा हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्याने अटक झालेल्यांची संख्या 7 झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खंबीर भूमिका घेऊन काणकोणकर यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण संरक्षण तसेच आवश्यक ती मदत देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
राज्यपाल पुसापती गजपती अशोक राजू यांनीही याप्रकरणी सरकार योग्य पावले उचलत असून हल्लेखोरांवर कडक कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे. या हल्ल्याप्र्रकरणी काल शुक्रवारी रात्री आणखी दोघांना गजाआड करण्यात यश मिळविले. पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता यांनी सांगितले की, कळंगुट येथील फ्रान्सिस डिकॉस्ता याला सांताव्रुझ-तिसवाडी येथून तर पिळर्ण-बार्देश साईराज गोवेकर याला म्हापसा येथून अटक केली आहे. त्याशिवाय ज्यांनी या हल्ल्याचे मोबाईलवरुन चित्रीकरण केले, त्याचीही ओळख पटलेली आहे. त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार आहे. पोलिस याप्रकरणी योग्य दिशेने तपास करत असून या हल्ल्यामागचा हेतू काय होता, हे सुद्धा लवकरच लोकांसमोर उघड करण्यात येईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.
सकाळपासून पणजीत आंदोलन सुरू
दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत विरोधी पक्षातील आमदार, नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी काल शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून आझाद मैदानावर जोरदार आंदोलन सुरु केले. रामा काणकोणकरवरील हल्ला प्रकरणातील सूत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित करीत सूत्रधाराचा शोध घ्या, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.
सोमवारी गोवा बंद करण्याचा इशारा
या प्रकरणामागे बडी धेंडे गुंतलेली असून त्याचा मास्टरमाईंड कोण? हे जनतेला कळालेच पाहिजे. सोमवारपर्यंत या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध लागला नाही, तर सोमवारी गोवा बंद करण्याबाबत विचार केला जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आझाद मैदानावर मोठा जमाव
आझाद मैदानावरील निदर्शनांमध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वेंझी व्हिएगस, आमदार विजय सरदेसाई, आमदार कार्लोस फेरेरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेसची गोवा प्रभारी अंजली निंबाळकर, आमदार वीरेश बोरकर, आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, टॅक्सी संघटनेचे सदस्य चेतन कामत, अनुसूचित जमाती समुदयाचे सदस्य कृष्णा मुळगावकर, भंडारी समाजाचे अध्यक्ष संजीव नाईक, गोविंद शिरोडकर, गिरीश चोडणकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी आमदार प्रसाद गावकर, ग्लेन काब्राल, सुनील कौठणकर, वाल्मिकी नाईक, मारियानो फेर्रांव, अॅड. राजू मंगेशकर, अॅड. सुहास नाईक, महेश म्हांबरे, केनेडी आफोन्सो आणि सुमारे 450 इतर लोक सभेत उपस्थित होते. आझाद मैदानावरील जाहीर सभा झाल्यानंतर या हल्ल्याची सुपारी देणारा मास्टरमाईंड कोण? हे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांना विचारण्यासाठी आंदोलकांनी आपला मोर्चा पोलिस मुख्यालयाच्या दिशेने वळविला. परंतु पोलिस महासंचालक व आंदोलक यांची भेट होऊ शकली नाही म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला.
आंदोलकांचे रस्त्यावरच ठाण
आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या आल्तीनो येथील शासकीय निवासस्थानी जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना चर्च स्क्वेअरकडे अडविले. पोलिस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची तसेच ढकलाढकली झाली. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुऊ केली. मुख्यमंत्र्यांकडून कसालाच प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलकांनी आपला मोर्चा भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर वळविला. जुने सचिवालय ते पाटो पूल दरम्यानचा मुख्य रस्ता अडवून मुख्यमंत्र्यांच्या भेटीची मागणी केली.
शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट
काही वेळेनंतर उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केले. मुख्यमंत्री आंदोलकांची भेट घेण्यास तयार असल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले. सगळे आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोचले. पण बंगल्यावर पोहोचताच केवळ पाचजणांच्या शिष्टमंडळाला आत पाठवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु मुख्यमंत्र्यांनी सर्व आंदोलकांना सामोरे जावे आणि या हल्ल्याप्रकरणी मास्टरमाईंड कोण याचे उत्तर द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यानंतर आमदार आणि आंदोलकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले.
मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिलेली आश्वासने
- मुख्यमंत्र्यांसोबतझालेल्याबैठकीनंतर शिष्टमंडळाने इतर आंदोलकांना माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री गोमेकॉत जाऊन रामा काणकोणकार यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत.
- रामाकाणकोणकरयांना गोमेकॉत तसेच त्यांच्या घरी संपूर्ण पोलिस संरक्षण देण्यात येईल.
- रामाकाणकोणकरयांना आवश्यक असलेली मदत देण्यात येईल.
- याहल्ल्याचाजो कोणी मास्टरमाईंड असेल, त्याला दोन दिवसाच्या आत अटक करण्यात येईल.
- पोलिसअधीक्षकराहूल गुप्ता यांनी याप्रकरणी तपासासाठी वेळ मागितली असून या प्रकरणाबाबत ते चोवीस तासांच्या आत सर्व माहिती देणार आहेत.
- हल्लेखोरांनाकलम307, रासुका कायदा लावणे आणि तडीपार करणे या मागण्यांवर मुख्यमंत्री विचार करणार आहेत.
- गँगवॉर100 टक्केनष्ट करण्यासाठी पोलिसांना मोकळीक देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला स्पष्ट केले.
रामा काणकोणकर हल्ला घटनाक्रम
- गुऊवार 18 रोजी दुपारी करंजाळे येथे सशस्त्र हल्ला. सहा संशयितांचा सहभाग.
- रात्रीपर्यंतहल्ल्यातील पाच हल्लेखोरांच्या आवळल्या मुसक्या. दोघांना दोडामार्ग येथे तर तिघांना मडगाव येथून अटक.
- संपूर्णगोव्यात हल्ल्याचे तीव्र पडसाद. शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून आझाद मैदानावर ‘मास्टरमाईंड’च्या अटकेसाठी आंदोलन.
- दुपारी 12 वाजता आंदोलक पोलिस महासंचालकाना भेटण्यास गेले, पण भेट झाली नाही.
- दुपारी 12.30 वाजता आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी गेले.
- विरोधकांनापोलिसांनीचर्चचौकात अडविल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडले.
- आंदोलकांचेशिष्टमंडळआल्तीनो येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटले.
- शिष्टमंडळानेआंदोलकांनासांगितले की, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
- मुख्यमंत्र्यांच्याआश्वासनानंतरआंदोलक फिरले माघारी.
- रात्रीदोघाहल्लेखोरांना अटक. आतापर्यंत एकूण 7 हल्लेखोरांना अटक.
- तरीहीअनुत्तरीतप्रश्न … हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण?









