छत्तीसगडमध्ये येथे चकमक सुरू
छत्तीसगड
दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलाची चकमक झाली. या चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले आहे. यावेळी दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता.
नारायणपूर, दंतेवाडा, कोंडागाव आणि जगदलपूर या जिल्ह्यातील डीआरजीसह एसटीएफ-सीआरपीएफ यांचा संयुक्त दल दक्षिण अबुझमद परिसरात नक्षरविरोधी शोध मोहिमसाठी रवाना झाला होता. पहाटे तीन वाजल्यापासून संयुक्त सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यामध्ये ही चकमक सुरु आहे. नक्षवाद्यांच्या गोळीबाराला चोख उत्तर पोलिस जवानांकडून दिले जात आहे.
शोध मोहिमेदरम्यान ७ गणवेशधारी नक्षलवादी ठार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चकमक आणि शोध मोहिम सुरू आहे, अशी माहिती बस्तरचे पोलिस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिली.









