वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रुनेई येथे नुकत्याच झालेल्या कनिष्ठांच्या नवव्या विश्व वुशू चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 7 पदकांची कमाई केली आहे.
या स्पर्धेत भारताच्या आर्यनने 48 किलो वजन गटात चीनच्या खेळाडूचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. भारताच्या शौर्याने इराणच्या स्पर्धकाचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. भारताच्या नांग मिंगबी बोरफुकेनने रौप्यपदक तसेच तनिष नगर, अभिजित, दिव्यानिशी व युवराज यांनी प्रत्येकी 1 कांस्यपदक मिळविले आहे. या स्पर्धेत 24 सदस्यांचा भारतीय संघ सहभागी झाला होता.









