वृत्तसंस्था/ सारन
दारूबंदी असलेल्या बिहार राज्यातील सारन जिल्हय़ात विषारी दारू प्याल्यामुळे सात जणांचा बळी गेला आहे. गेल्या आठवडय़ात याच जिल्हय़ात अशाच प्रकारे 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हय़ात तणाव निर्माण झाला आहे. विषारी दारूच्या पुरवठादारांना पकडण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र अद्याप या दारू शोकांतिकेचे सूत्रधार सापडलेले नाहीत. हा प्रकार गेल्या आठवडय़ात घडला असून फुलवारिया पंचायतीच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया मातेर पोलीस स्थानकाच्या एसएचओला तसेच याच पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.









