प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी जाणार
सांगली – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीची प्रक्रिया पुढे सरकत आहे. जिल्हा परिषदेच्या गटांपैकी सात गट अनुसूचित आरक्षित आहेत. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने गट निश्चित करण्यात आले आहेत.सात गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने गट निश्चित करण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने यासंबंधीचा अहवाल सोमवारी (६) विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. दरम्यान म्हैसाळ, मालगाव, कवलापूर, रांगणी, उमदी, सावळज, बेडग, दिघंची या गटांचा समावेश असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद व पचायत सामत्या निवडणुकीसाठा ८ ऑक्टोंबरला प्रारुप यादी प्रसिद्ध होईल. गटांच्या आरक्षण सोडत १३ ऑक्टोंबरला काढण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या गटांसाठी व पंचायत समित्यांच्या गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे ६१ गट आणि पंचायत समितीसाठी १२२ गणांचा समावेश आहे.
सात गट हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित केले आहेत. जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्याप्रमाणावर आधारित है आरक्षण निश्चित केले आहे. प्रशासनाने यासंबंधीचा अहवाल तयार करून सोमवारी (६) विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.
त्यानंतर बुधवारी विभागीय आयुक्तांकडून अंतिम मान्यता मिळणार आहे. सात गट आरक्षित झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची समीकरणे बदलणार आहेत. विशेषतः सामान्य प्रवर्गातील दावेदारांना राजकीय गणित नव्याने आखावे लागणार आहे.
सात गट अनुसूचित जातीसाठी राखीव?
जिल्ह्यातील सात जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित राहतील. नवीन नियमावलीनुसार आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित करत असताना जिल्हा परिषद गटातील अनुसूचित जाती, जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गटापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने आरक्षित करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कवलापूर (ता. मिरज), म्हैसाळ (ता. मिरज), मालगाव (ता. मिरज), रांजणी (ता. कवठेमहांकाळ), उमदी (ता. जत), सावळज (ता. तासगाव), बेडग (ता. मिरज), दिघंची (ता. आटपाड़ी) हे गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








