मुंबई
काल रात्री कुर्ला येथील आंबेडकर नगरमध्ये बसचा भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री १० च्या सुमारास बसने गाड्यांना धडक दिली आहे. या अपघातात ७ जण मृत्यूमुखी पडले असून ३१ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये गस्तीवर असलेले ४ पोलिस आणि एक एमएसएफ जवान यांचाही समावेश आहे.
या प्रकरणी बसचालक संजय मोरे (वय ५४) .यांना अटक झाली आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बस चालकाने दिलेली माहिती अशी, बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता. बसचा स्पीड अचानक वाढला आणि ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला.








