जत,प्रतिनिधी
जत तालुक्यातील मुचंडी येथील पायनाळ वस्ती येथे सात किलो 600 ग्रॅम वजनाचा व अंदाजे एक लाख 74 हजार 800 रुपयांचा गांजा सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत जप्त केला आहे. यामध्ये श्रीकांत धनाप्पा स्वामी (सध्या रा. पायनाळ, मुचंडी, ता. जत) याला पोलिसांनी अटक केली आहे.शुक्रवारी सायंकाळी उशिरा ही कारकाई करण्यात आली.याबाबत जत पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल आमसिद्ध खोत यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सांगलीच्या स्थानिक गुन्हे विभागाला मुचंडी येथील पायनाळ वस्तीवर श्रीकांत स्वामी यांनी आपल्या शेतात गांजाची झाडे लावल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी त्यांच्या शेतात पाहणी केली असता गांजाची झाडे आढळून आली.
दरम्यान, पोलिसांनी सात किलो 600 ग्रॅम झाडे जप्त केली असून त्याची अंदाजे एक लाख 74 हजार 800 रुपये इतकी किंमत होते. याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जगताप करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








