उत्तर कर्नाटक अंजुमन-ए-इस्लामची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
म्हादई वादामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे म्हादई पाणी वाद लवकरात निकालात काढण्यात यावा, तसेच हुबळीतील रखडलेल्या हाज भवनचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे व उर्दू युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी सुवर्णसौध येथे हुबळीच्या उत्तर कर्नाटक अंजुमन ए इस्लाम संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.
म्हादई वादामुळे पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत आहे. हा वाद निकालात काढण्यात यावा, तसेच हुबळी एअरपोर्टचे काम लवकर सुरू करण्यात यावे. हावेरी, कोप्पळ किंवा बेळगावात उर्दू युनिव्हर्सिटी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.









