न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडीतील मळगाव या गावातील बाजारपेठेत (रस्तावाडी) शाळेतील मुलांची, कामासाठी आलेल्या लोकांची गर्दी ही भरपुर प्रमाणात असते त्यात टू व्हीलर, फोर व्हीलरचा, डंपर इ. ची वाहतुक मोठ्या प्रमाणात असते.मळगाव- नेमळे रोडवर मळगाव रस्तावाडीत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव ही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असणारी शाळा आहे. या शाळेत ७०० च्या वर विद्यार्थी शिक्षणासाठी मळेवाड, न्हावेली, सोनुर्ली, नेमळे, मळगाव, वेत्ये, निरवडे- कोनापाल या गावातुन येतात. त्यात मळगाव व बाहेरील गावातील लोकांची आणि गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे लहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. हल्लीच धुम स्टाईल टू व्हीलरने एका शाळेतल्या १३ वर्षीय मुलीला ठोकरून अपघात झाला. त्या आधी असे बरेच अपघात झाले.अशा वारंवार होणाऱ्या अपघातामुळे मळगाव (रस्तावाडी) बाजारपेठेत मळगाव- नेमळे रोडवर मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या शाळेच्या समोरील रस्त्यावर गतिरोधक घालणे अत्यंत महत्त्वाचे आहेत.मळगाव इंग्लिश स्कूल समोरच्या रस्त्यावर गतिरोधक लवकरात लवकर नाही घातल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावातील लोकांना घेऊन जन आक्रोश आंदोलन करेल.यावेळी निवेदन देण्यास गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी चव्हाण मॅडम सुट्टीवर असल्या कारणाने उपकार्यकारी अभियंता गोवेकर मॅडमने निवेदन स्विकारले.त्यावेळी मनसेचे पदाधिकारी सुधीर राऊळ, राकेश परब, जय राऊळ, केतन सावंत, ओमकार नवार, प्रसाद सामंत, आदित्य राऊळ, सिध्देश सावंत इ. उपस्थित होते.
Previous Articleशुभवर्तमान ! अंजुणे धरण भरण्याची प्रक्रिया सुरू
Next Article ‘सिया’ने बर्लिनमध्ये चार पदकांसह फडकवला तिरंगा









