ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या बस सेवांमधून कमी उत्पन्न मिळत असल्याने 11 मार्गांवरील बस सेवा उद्यापासून (दि. 26) बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या ग्रामीण भागात पीएमपीएमएलची बससेवा सुरळीत सुरू आहे. मात्र, काही भागांमध्ये प्रवाशांची संख्या खुपच कमी आहे. या मार्गांवर पीएमपीएमएलला उत्पन्न मिळण्याऐवजी तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे 11 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे. या मार्गांवर बंद होणारी बस सेवा पिंपरी-चिंचवडमध्ये जास्तीची पुरवली जाणार आहे. पीएमपीएमएलच्या या निर्णयामुळे बस बंद होणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होणार आहे.
‘या’ 11 मार्गांवरील बस होणार बंद
मार्केटयार्ड ते खारावडे
कापूरहोळ ते सासवड
स्वारगेट ते काशिंगगाव
चाकण ते शिक्रापूर फाटा
सासवड ते यवत
कात्रज ते विंझर
हडपसर ते जेजुरी
वाघोली ते राहूगाव, पारगाव
स्वारगेट ते बेलावडे
सासवड ते उरुळी कांचन
हडपसर ते मोरगाव