वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 0-2 अशा फरकाने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन करून ऑस्ट्रेलियाबरोबरच्या अॅशेस मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधल्याबद्दल इंग्लंड क्रिकेट संघाचे कौतुक केले आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाला 2001 नंतरचा इंग्लंडवरील अॅशेसमधील पहिला मालिका विजय नाकारला गेला.
सचिनच्या मते, ही दीर्घकाळ लक्षात राहण्यासारखी मालिका राहिली. 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर बरोबरी साधण्यापर्यंत या अॅशेस मालिकेत इंग्लंडची दिसून आलेली दृढता ही कसोटी क्रिकेटच्या सौंदर्याला खरे तर मानवंदना आहे. उसळी घेण्याची क्षमता या प्रकारच्या क्रिकेटमध्ये हव्या असलेल्या निर्धाराची खोली आणि मानसिक दृढता दर्शवते. निसर्गाने मालिकेचा निकाल लागू दिलेला नसेल, परंतु यामुळे या खेळाचे ‘स्पिरीट’ कमी झाले नाही. दीर्घकाळ ही मालिका स्मरणात राहील, असे ट्विट सचिनने केले आहे.









