संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ करवीर दौरा.
आमशी
देशाचे भवितव्य ठरविणारी नरेंद्र मोदी विरुध्द राहूल गांधी अशी लोकसभेची निवडणूक आहे. गेल्या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशात विकासाच्या अनेक योजना राबविल्या. पण काँग्रेसने गेल्या साठ वर्षाच्या सत्तेच्या काळात घोटाळयांची अन भष्ट्राचाराची मालिकाच निर्माण केली. ठअसे घणाघात खासदार धनंजय महाडिक यांनी केला.
महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित संपर्क द्रौयावेळी आमशी (ता. करवीर) येथे ते बोलत होते.
खासदार महाडिक म्हणाले, ठकोल्हापूर जिल्हयातील पायाभूत विकासासाठी खासदार मंडलिकांनी वेळोवेळी संसदेत प्रश्न मांडून विकासकामांचा पाठपुरावा करण्याबरोबरच मोठया प्रमाणावर निधीही खेचून आणला. त्यामुळे विकासकामांचा ध्यास असणा- या संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा खासदार करुन संसदेत पाठवूया.
यावेळी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले,ठ खासदार संजय मंडलिक यांनी गेल्या पाच वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघातील रस्ते, सामाजिक सभागृह, तालीम इमारत यासाठी कोट्यावधीचा निधी दिला. सर्वसामान्य शेतकरी व गरीबांना केंद्रबिंदू मानून मोदी सरकारने राबविलेल्या योजनांमध्ये पीएम किसान योजनेद्वारे देशभरातील शेतक्रयांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत. त्याचबरोबर गोर-गरिबांना रेशनच्या माध्यमातून मोफत धान्य दिले जात आहे. त्यामुळे विकासाची दुरदृष्टी असण्राया नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी करवीरची जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहील.
यावेळी हंबीरराव पाटील, मधुकर जांभळे, दत्तात्रय मेडशिंगे, सरदार सावंत, आमशी गांवच्या सरपंच आरती सावंत, कुंभी कारखाना संचालिका धनश्री पाटील, ज्ञानदेव पाटील, प्रकाश पाटील, नामदेव पाटील, कुंभी कारखाना संचालक उत्तम वरुटे, दादासो लाड, किशोर पाटील, सर्जेराव हुजरे, शिवाजी देसाई, सदाशिव बाटे, आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.