नवी दिल्ली :
दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगणारा सीरियल किलर सोहराब फरार झाला आहे. सोहराब हा तीन दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर पडला होता, परंतु पॅरोल संपुष्टात आल्यावरही तो तुरुंगात परतला नाही. तुरुंग प्रशासन आता लखनौ पोलिसांसोबत मिळून सोहराबचा शोध घेत आहे. सोहराब एक धोकादायक गुन्हेगार अन् सीरियल किलर आहे. त्याने अनेक हत्या घडवून आणल्या आहेत. सोहरबाने समाजवादी पक्षाचे माजी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांच्या नातीची हत्या घडवून आणली होती. याचबरोबर भाजपचे माजी नगरसेवक पप्पू पांडे यांची त्याने हत्या करविली होती. तर त्यापूर्वी स्वत:च्या भावाची हत्या करणाऱ्या तीन जणांची सोहराबने हत्या केली होती. सोहराब आता पॅरोल समाप्त झाल्यावरही न परतल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे तिहार प्रशासनाने त्वरित लखनौ पोलिसांशी संपर्क साधून सोहराबचा शोध सुरू केला आहे.









