Sergeant Swarangi Khanolkar felicitated by Kalsulkar School
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी संचालित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी या प्रशालेतील इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर एनसीसी कॅडेट ही दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी दिल्ली येथे झालेल्या मुख्य गणतंत्र दिवस परेड मध्ये सहभागी झाली होती. कळसुलकर प्रशाला, सावंतवाडी शहर, सिंधुदुर्ग जिल्हा, तसेच 58 महाराष्ट्र बटालियन सर्वांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. दिनांक 2 सप्टेंबर 2022 ते 5 फेब्रुवारी 2023 या दीर्घकाळात विविध कॅम्प करून दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात सहभागी होऊन स्वरांगीचे सावंतवाडीत उद्या सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी आगमन होत आहे. गवळी तिठा- गांधी चौक – कळसुलकर प्रशाला या मार्गावर तिचे भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशालेत तिचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. जूनियर डिव्हिजन एनसीसी मुलींमधून अशी कामगिरी करणारी जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थीनी आहे. स्वरांगीने ही उत्तुंग कामगिरी करून कळसुलकर प्रशालेचा गौरव देशभरात पसरवला. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









