वृत्तसंस्था/ ऍडलेड
एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या ऍडलेड खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचने एकेरीचे अजिंक्यपद मिळवताना सेबॅस्टियन कोर्दाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची टेनिस स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
या स्पर्धेत शनिवारी जोकोविचने उपांत्य लढतीत रशियाच्या मेदवेदेव्हचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर जोकोविचने अंतिम सामन्यात कोर्दाचा 6-7 (6-8), 7-6(7-3), 6-4 असा पराभव केला. 35 वर्षीय जोकोविच आता 16 जानेवारीपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. जोकोविचने आतापर्यंत नऊवेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.









