वृत्तसंस्था/ जेदाह (सौदी अरेबिया)
एटीपी टुरवरील शनिवारी येथे झालेल्या नेकस्ट जनरल चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या हमाद मेडजेडोव्हिकने पुरूष एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना टॉप सिडेड आर्थर फिल्सचा पराभव केला.
हा अंतिम सामना पाच सेट्समध्ये रंगला होता. मेडजेडोव्हिकने फिल्सचा 3-4 (6-8), 4-1, 4-2, 3-4 (9-7), 4-1 असा पराभव केला. हा अंतिम सामना 2 तास 11 मिनिटे चालला होता. एटीपी टुरवरील ही स्पर्धा पहिल्यांदाच सौदी अरेबियामध्ये भरविली गेली होती. फ्रान्सच्या 36 व्या मानांकित फिल्सने चालू वर्षी झालेल्या लियॉन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.









