वृत्तसंस्था/ मेलबर्न
मेलबर्न पार्कच्या टेनिस कोर्टवर 16 ते 29 जानेवारी दरम्यान होणाऱया 2023 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सर्बियाचा माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचचे येथे आगमन झ्घले आहे. सदर माहिती येथील एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केली आहे. जोकोविचचे ऑस्ट्रेलियात जवळपास एक वर्षानंतर पुनरागमन होत आहे.
रविवारी जोकोविचचे ऍडलेडच्या विमानतळावर आगमन झाले. जोकोविचने आतापर्यंत 9 वेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली असून आता तो दहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी आतुरलेला आहे. 2022 च्या टेनिस हंगामात जोकोविचला ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा हुकल्या होत्या. पुढील आठवडय़ात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱया सरावाच्या टेनिस स्पर्धामध्ये जोकोविच सहभागी होणार आहेत. गुरुवारपासून येथे मिश्र सांघिक युनायटेड चषक टेनिस स्पर्धा सुरू होणार आहे. जोकोविच आता पुढील आठवडय़ात ऍडलेड टेनिस स्पर्धेत सहभागी होणार आहे. जोकोविचने 2022 च्या अखेरीची एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा गेल्या महिन्यात ज्ंिाकली होती.









