वृत्तसंस्था/ मनिला
येथे झालेल्या विश्वचषक पुरुषांच्या बास्केटबॉल स्पर्धेत सर्बियाने उपांत्य लढतीत कॅनडाचा 95-86 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. सर्बिया संघातील निकोला जोकीक हा स्पर्धेतील सर्वोत्तम बास्केटबॉलपटू ठरला आहे.
या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या बोगडेनने 23 गुणांची नोंद केली. दरम्यान डोब्रीक आणि मिलुटिनोव्ह यांनी प्रत्येकी 16 गुण नोंदवले. विश्वचषक बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्बियाने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. 2014 साली या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेने सर्बियाचा पराभव केला होता. आता या स्पर्धेत अमेरिका आणि जर्मनी यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर रविवारी अंतिम सामना खेळवला जाईल. कॅनडातर्फे बॅरेटने 23 गुण नोंदवले. या स्पर्धेत कॅनडाने विद्यमान ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या फ्रान्सचा 95-65 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.









