वृत्तसंस्था /व्हॅलेन्सिया (स्पेन)
सर्बियाचा टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचने एकेरीचा सामना जिंकून डेव्हिस चषक क्रिकेट स्पर्धेच्या लढतीत आपल्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेले. सर्बियाने या लढतीत स्पेनवर 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. पाच दिवसापूर्वी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचने 2021 नंतर प्रथमच डेव्हिस चषक स्पर्धेत आपला सहभाग दर्शवला आहे. पहिल्या एकेरी सामन्यात जोकोविचने स्पेनच्या फोकिनाचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. दुसऱ्या एकेरी सामन्यात सर्बियाच्या डिजेरीने स्पेनच्या विनोलासवर मात केली.









