वृत्तसंस्था / डोहा
येथे सुरू असलेल्या 53,500 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षिस रक्कमेच्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या व्ही. सेंथिलकुमार आणि अभय सिंग यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत दुसऱ्या फेरीतील झालेल्या सामन्यात विद्यमान राष्ट्रीय विजेत्या सेंथिलकुमारने इजिप्तच्या ओमन मोसादचा 13-11, 11-3, 9-3 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. मोसादने दुखापतीमुळे हा सामना अर्धवट सोडला. दुसऱ्या सामन्यात अभय सिंगने फ्रान्सच्या ऑगेस्टी ड्युसोर्डचा 11-7, 5-11, 10-12, 11-5, 9-3 असा पराभव केला.









