वृत्तसंस्था / कुचींग (मलेशिया)
येथे सुरू असलेल्या 2025 च्या आशियाई स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा स्क्वॅशपटू व्हेलाव्हेन सेंथीलकुमारने पुरुष एकेरीची उपांत्यफेरी गाठत आपले पदक निश्चित केले आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 45 व्या मानांकित सेंथीलकुमारने मलेशियाच्या जोकीम चुहाचा 11-7, 11-6, 11-6 अशा 3-0 गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. आता सेंथीलकुमार आणि हाँगकाँगचा द्वितीय मानांकीत केवॉन यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. 2023 साली झालेल्या या स्पर्धेत सेंथीलकुमारने रौप्य पदक मिळविले होते. मात्र या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या दिवाकर सिंग आणि राहुल बैथा यांना मात्र प्राथमिक फेरीतच पराभव पत्करावा लागला.









