वृत्तसंस्था/ कुचिंग (मलेशिया)
आशियाई स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा स्क्वॅशपटू वेलाव्हेन सेंथीलकुमारने पुरूष एकेरीत कांस्यपदक मिळविले. रौप्यपदकासाठी झालेल्या लढतीत हाँगकाँगच्या द्वितीय मानांकीत केवॉनने भारताच्या सेंथीलकुमारचा 3-1 (9-11, 11-13, 11-5, 11-6) अशा गेम्समध्ये पराभव केला. हा सामना 65 मिनिटे चालला होता. आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेतील सेंथीलकुमारचे हे सलग दुसरे पदक आहे. 2023 साली झालेल्या या स्पर्धेत सेंथीलकुमारने रौप्यपदक मिळविले होते. या स्पर्धेत उपांत्यफेरीच्या सामन्यात हार पत्करणाऱ्या स्क्वॅशपटूंना कांस्यपदक दिले जाते. त्यामुळे सेंथीलकुमार हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत आता पुढील आठवड्यात पुरुष दुहेरी प्रकार खेळविला जाणार असून अनहात सिंग आणि अभय सिंग हे भारताचे प्रतिनिधीत्व करतील.









