निफ्टी 19700 च्या जवळपास पोहोचत बंद : एअरटेल, जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिल्याचा सकारात्मक परिणाम हा भारतीय भांडवली बाजारात मंगळवारच्या दिसून आला आहे. यामध्ये मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले. मंगळवारी सेन्सेक्स विक्रमी कामगिरी करत 567 अंकांनी मजबूत झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 566.97 अंकांनी वधारुन निर्देशांक 66,079.36 वर बंद झाला. तर निफ्टी 177.50 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 19,689.85 वर स्थिरावला आहे. निफ्टीत आयटी, बँक, मिडकॅप यांचे निर्देशांक वधारले असून अन्य क्षेत्रांची स्थिती काहीशी योग्य राहिल्याची नोंद केली आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये जेएसडब्ल्यू स्टील, ओमॅक्स, अदानी पोर्ट, कोल इंडिया, हिंडाल्को यांचे समभाग मजबूत राहिले. तर फ्यूचर लाईफस्टाइल, फॅशन, त्रिवेणी टरबाईन, वर्धमान टेक्सटाइल्स यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले आहेत. यावेळी सेन्सेक्समधील 27 समभाग हे तेजीत राहिल्याची नोंद केली आहे.
सोमवारच्या मोठ्या घसरणीमुळे मंगळवारी बाजारात काहीसे चिंतेचे ढग राहिले होते. यामध्ये इस्रायल व हमास यांच्यातील संघर्षामुळे याचा प्रभाव जगभरातील विविध शेअर बाजारांवर झाला आहे. मात्र सेन्सेक्स व निफ्टी यांच्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. अन्य शेअर बाजारांची स्थिती पाहिल्यास यामध्ये जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग यांच्यासह आशियातील प्रमुख बाजारात सकारात्मक स्थितीचा कल राहिला होता. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.
30 समभागांच्या निर्देशांकांत सेन्सेक्समधील 27 समभाग हे वधारुन बंद झाले. तर 3 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. यामध्ये भारती एअरटेल 2.90 टक्के, तर कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स यांचे समभाग दोन टक्क्यांनी वधारले. तर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, टाटा स्टील, स्टेट बँक, मारुती सुझुकी, आयटीसी यांचे समभाग वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, टीसीएस आणि टायटन यांचे समभाग काहीशा घसरणीसह बंद झाले.








