निफ्टी 17,550 च्या वर : नायकाचे समभाग 8 टक्क्यांनी तेजीत
मुंबई
चालू आठवड्यामध्ये पहिल्या दिवशी सोमवारी बाजार सुरु होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी महावीर जयंती असल्यामुळे बाजाराला सुट्टी होती. त्यानंतर बुधवारी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतीय भांडवली बाजार पुन्हा नव्या मजबूत तेजीसोबत सुरु झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्सने 583 अंकांची मजबूत तेजी प्राप्त केली होती.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 582.87 अंकांनी वधारुन 0.99 टक्क्यांसोबत निर्देशांक 59,689.31 वर बंद झाला आहे. यासोबतच दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 159.00 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,557.05 वर बंद झाला आहे.
प्रमुख क्षेत्रांच्या कामगिरीचा आलेख बुधवारी पाहिल्यास यामधील मुख्य क्षेत्रांपैकी कॅपिटल गुड्स, एफएमसीजी आणि माहिती तंत्रज्ञान यांचे निर्देशांक 1 ते 2 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. यासोबतच वाहन, पॉवर आणि पीएसयू बँक यांच्या समभागात विक्री राहिली होती. यावेळी नायकाचे समभाग सर्वाधिक म्हणजे 8 टक्क्यांनी तेजीत राहिले होते.
हे समभाग वधारले
बीएसई सेन्सेक्समधील लार्सन अॅण्ड टुब्रोचे समभाग 4 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच एचडीएफसी 3 टक्के, एचडीएफसी बँक 2.72 टक्के, सनफार्मा 1.93 टक्के, आयटीसी 1.93 टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर 1.78 टक्क्यांनी समभाग तेजीत राहिले होते. यासह अन्य कंपन्यांमध्ये टायटन, टीसीएस, एचसीएल टेक, एशियन पेन्ट्स, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड कॉर्प, विप्रो, टाटा मोटर्स आणि भारती एअरटेल यांचे समभाग वधारत बंद झाले आहेत. इंडसइंड बँकेचे समभाग हे सर्वाधिक 1.26 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, स्टेट बँक, मारुती, नेस्ले इंडिया आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी 33 पैशांनी वधारुन 82 वर बंद झाला आहे.









