63,588 अंकांसह सेन्सेक्सची बाजारात नव्या उंचीवर झेप
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये सलगची तेजी नोंदवत बाजार बंद झाला आहे. यामध्ये सेन्सेक्स निर्देशांकाने 63,588 अंकांच्या मजबूतीसोबत नवी उंची प्राप्त केली असल्याची नोंद यावेळी करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 195.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.31 टक्क्यांसोबत 63,523.15 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 40.15 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 18,856.85 वर बंद झाला आहे. यामध्ये ब्लूडार्टचे समभाग हे सात टक्क्यांनी वधारुन बंद झाले.
धातू क्षेत्राचा निर्देशांक 1 टक्क्यांनी प्रभावीत झाला आहे. यासह एफएमसीजी आणि रियल इस्टेटचे समभाग घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे पॉवरग्रीड कॉर्पचे निर्देशांक आणि आईल अॅण्ड गॅसचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि टेक महिंद्रा यांचे समभाग 1 टक्क्यांनी वधारले.
15 वर्षांतील सेन्सेक्सची झेप
15 जुलै 1990 रोजी बीएसई सेन्सेक्स पहिल्यांदा 1,000 अंकांवर पोहोचला होता. 1 हजार ते 10 हजार इथपर्यंत येण्यासाठी सेन्सेक्सला जवळपास 16 वर्षांचा प्रवास(6 फेब्रुवारी 2006 ) करावा लागला. परंतु 10 हजार ते 60 हजार हा प्रवास करण्याकरीता फक्त 15 वर्षाचा कालावधी लागल्याची नोंद केली आहे.
समभाग घसरणीत राहिलेल्या कंपन्यांमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग हे सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. याच्या व्यतिरिक्त आयटीसीचे समभाग 1 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यांचे समभाग हे नुकसानीत राहिले आहेत.
मंगळवारी 20 जून रोजी ट्रेडिंगच्या दरम्यान फॉरेन इंस्टीट्यूशन इन्वेस्टर्स यांनी निव्वळ विक्री केली आहे.









