आयटी समभाग दबावात : जागतिक बाजारांमध्ये नरमाई
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी तेजीच्या प्रवासाला विराम मिळाल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील नरमाईचा राहिलेला कल व आयटी क्षेत्रात आलेल्या दबावाचा हा परिणाम झाल्याचे दिसून आले. मागील चार सत्रांमधील तेजीला ब्रेक लागला आहे.
बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 195.16 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 73,677 वर बंद झाला आहे. दिवसअखेर निफ्टी 49.30 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 22,356 वर बंद झाला. दरम्यान बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.17 टक्के आणि 0.63 टक्क्यांसोबत प्रभावीत होत बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग हे चार -चार टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. तसेच नेस्ले इंडिया, इन्फोसिस, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग हे घसरणीत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, भारतीय स्टेट बँक, सनफार्मा आणि एनटीपीसी यांचे समभाग नफा कमाईत राहिले. तसेच टाटा मोर्ट्सचे समभाग हे 3.52 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. ट्रेडिंगच्या दरम्यान 52 आठवड्यांनंतर उच्चांकी पातळी गाठली आहे. कंपनीने आपल्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांचा व्यवहार हा दोन वेगवेगळ्या सुचीबद्ध कंपन्यांमध्ये करण्याच्या घोषणेमुळे समभागांमध्ये तेजीचा कल राहिला आहे.
जागतिक पातळीवरील घडामोडी
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये आशिया आणि अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरिया आणि जपानचा निक्की व हाँगकाँगचा हँगसेंग यांची कामगिरी नुकसानीत राहली होती.मात्र चीनचा शांघाय कम्पोझिट हे नफा कमाईत राहिले होते. युरोपमधील मुख्य बाजारांमध्ये सुरुवातील नकारात्मक कल राहिला होता. अमेरिकन बाजारात सोमवारी मात्र घसरण राहिली होती. जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 0.21 टक्क्यांनी घसरणीसह 82.63 डॉलर प्रति बॅरेल राहिले आहे.
विदेशी संस्थांच्याकडून मिळालेल्या गुंतवणुकीमुळे सोमवारी 564.06 कोटी रुपये किमतींच्या समभागांची विक्री झाली आहे. बीएसई सेन्सेक्स सोमवारी विक्री म्हणजे 73,872.29 वर राहिला होता. तर निफ्टी 22,405.60 हा पातळीवर रहिल्याची नोंद करण्यात आली आहे.









