मुंबई :
भारतीय शेअर बाजारात बुधवारी मुंबई शेअर बाजारासाठी सेन्सेक्स निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक यांनी सर्वकालीन उच्चांक प्रस्थापित केला. सेन्सेक्स निर्देशांकाने 64 हजाराचा तर निफ्टी निर्देशांकाने 19 हजाराचा टप्पा ओलांडला होता. दुसरीकडे बँकांच्या सहभागाचा बँक निफ्टी निर्देशांकानेसुद्धा 44,500 अंकांच्या स्तरावर पोहोचत नवा सर्वकालीन उच्चांक प्रस्थापित केला. गेल्या तीन सत्रातील तेजी पाहता गुंतवणुकदारांच्या संपतीमध्ये 3 लाख कोटींची वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी सकाळी सेन्सेक्स 63,701.78 या विक्रमी स्तरावर खुला झाला तर निफ्टी देखील 18,908.15 अंकांवर नव्या उच्चांकावर खुला झाला.









