एसबीआय लाईफ तेजीत, सनफार्माचे समभाग प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक चालू आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी तेजीत राहिले होते, तर दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सत्रात मात्र त्यांची पडझड झाल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील घटनांसोबत देशातील काही घटनांचा भारतीय शेअर बाजारात नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 237.73 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 63,874.93 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 61.30 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 19,079.60 वर बंद झाला आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर मीडिया निर्देशांकामध्ये दोन टक्क्यांची तेजी नोंदवली आहे. तर निफ्टीत रियल्टी निर्देशांक एक टक्क्यांनी प्रभावीत झाला. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप यांच्यात तेजीची झूळुक राहिली होती. निफ्टीमधील एफएमसीजीत तेजी राहिली तर निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, फार्मा, वाहन, बँक यांचे निर्देशांक वधारत बंद झाले आहेत.
मंगळवारी स्टोव क्राप्ट चार टक्क्यांनी तेजीसह बंद झाला. ओम इंफ्राचे समभाग वधारले आहेत. सेन्सेक्समधील मुख्य कंपन्यांमध्ये एसबीआय लाईफ, टायटन, एचडीएफसी लाइफ आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग तेजीत राहिले असून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयशर मोर्ट्स आणि एलटीआय मांइडट्री यांचे समभाग नकारात्मक स्थितीत राहिले आहेत. 11 समभाग तेजीत तर अन्य नुकसानीत राहिले होते.
बाजाराची दिशा कशी राहणार?
आगामी काळात भारतीय बाजारात सर्वात मोठा सण दिवाळी येत असून या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. इस्रायल हमास यांच्यातील युद्धाची स्थिती व जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे वाढणारे भाव यावर हा प्रवास निश्चित होणार आहे. यामुळे सावध भूमिका गुंतवणूकदारांना घ्यावी लागेल.









