सेन्सेक्स निर्देशांकाचा 66 हजारांना स्पर्श: टीसीएस मजबूत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारातील बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये काहीकाळ सेन्सेक्सचा निर्देशांक तब्बल 66 हजार अंकांना स्पर्श करुन पुन्हा मुळ स्थितीत परतला. दिग्गज कंपन्यांमध्ये टीसीएसचे समभाग सर्वाधिक मजबूत राहिले होते. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने गुरुवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 164.99 अंकांसोबत 0.25 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 65,558.89 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 29.45 अंकांच्या मदतीने 0.15 टक्क्यांसह निर्देशांक 19,413 वर बंद झाला आहे. निफ्टीमध्ये टीसीएसचे समभाग हे 2.60 टक्क्यांनी मजबूत राहिल्याचे दिसून आले. बीएसई सेन्सेक्समध्ये टीसीएसचे समभाग हे 2.47 टक्क्यांनी वधारले. यासोबतच इन्फोसिसचे समभाग हे 2.40 टक्के, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग हे एक-एक टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग सर्वाधिक 3.35 टक्क्यांनी प्रभावीत झाले. यासह मारुती सुझुकी, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, टायटन, एशियन पेन्ट्स जेएसडब्ल्यू स्टील, सनफार्मा आणि एचसीएल टेक यांचे समभाग हे घसरुन बंद झाले.
या क्षेत्रांची कामगिरी
भारतीय बाजारात गुरुवारच्या सत्रात मुख्य क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने बँक, धातू, रियल इस्टेट आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये लिलाव राहिला होता. तसेच वाहन, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये विक्रीचा कल राहिला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक प्रत्येकी 0.5 टक्क्यांनी घसरले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टीसीएस 3340
- हिंडाल्को 435
- इन्फोसिस 1365
- एलटीआय माइंडट्री 4893
- बजाज फिनसर्व्ह 1615
- टेक महिंद्रा 1175
- एचडीएफसी लाईफ 680
- आयसीआयसीआय बँक 955
- अॅक्सिस बँक 960
- एसबीआय लाईफ इन्शु. 1313
- विप्रो 394
- बजाज फायनान्स 7474
- एचडीएफसी बँक 1641
- इंडसइंड बँक 1376
- ब्रिटानिया 5090
- टाटा स्टील 114
- अल्ट्राटेक सिमेंट्स 8234
- ओएनजीसी 167
समभाग घसरलेल्या कंपन्या
- पॉवरग्रीड कॉर्प 243
- युपीएल 631
- कोल इंडिया 229
- मारुती सुझुकी 9647
- बीपीसीएल 379
- एनटीपीसी 187
- अपोलो हॉस्पिटल 5182
- अदानी एंटरप्रायजेस 2362
- आयशर मोटर्स 3257
- नेस्ले 22820
- ग्रेसीम 1759
- अदानी पोर्ट्स 717
- डॉ. रे•ाrज लॅब्ज 5142
- रिलायन्स 2743
- एचयुएल 2654
- एसबीआय 585
- भारतीय एअरटेल 885
- कोटक महिंद्रा 1869
- जेएसडब्ल्यू स्टील 802
- टायटन 3084
- डीव्हीज लॅब्ज 3620
- सनफार्मा 1075
- बजाज ऑटो 4866









