सलग सहावे सत्र प्रभावीत : अदानी एंटरप्रायजेसचे समभाग 5 टक्क्यांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांचे समभाग सलगच्या घसरणीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये सेन्सेक्स 141 तर निफ्टी45.45 इतक्या अंकांनी नुकसानीत राहिल्याचे दिसून आले. अन्य घडामोडींमध्ये जागतिक बाजारांमध्ये तेजीच्या वातावरणाचा प्रभाव देशातील बाजारावर राहिला.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 141.87 अंकांनी घसरुन निर्देशांक 59,463.93 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 45.45. अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 17,465.80वर बंद झाला आहे. यामध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 घसरणीत तर 14 तेजीत राहिल्याची नोंद केली आहे
अदानी समभाग गडगडले
अदानी समूहाच्या 10 समभागांपैकी 8 समभाग घसरले आहेत. तर समूहातील फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेसचे समभाग हे 5.11 टक्क्यांनी तर अन्य कंपन्यांमध्ये अदानी ट्रान्समिशन, पॉवर, टोटल गॅस व ग्रीन एनर्जी यांच्यात 5 ते 5 टक्क्यांनी समभाग प्रभावीत झाले तसेच एनडीटीव्ही, अदानी विल्मर व एसीसी यांचेही समभाग नुकसानीत तर अदानी पोर्ट व अंबुजा सिमेंट तेजीत राहिल्याची नोंद करण्यात आली.
अन्य कंपन्यांमध्ये हिंडाल्को, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, जेएसडब्लू स्टील, टाटा मोर्ट्स, लार्सन अॅण्ड टुब्रोसह आयशर मोर्ट्स घसरणीत राहिले. तर निफ्टीमधील ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, एशियन पेन्ट्स, डिव्हीस लॅब, अपोलो हॉस्पिटल , कोल इंडिया व बजाज फिनसर्व्हसह निफ्टीतील 24 समभाग तेजीत राहिले आहेत.
या क्षेत्रांमध्ये पडझड :
प्रमुख क्षेत्रांची कामगिरी पाहिल्यास यामध्ये धातूचे निर्देशांक 3 टक्क्यांनी तर वाहन क्षेत्राचा निर्देशांक हा 1 टक्क्यांनी प्रभावीत राहिला आहे.
जागतिक पातळीवरील घडामोडींचा देशातील बाजारावर परिणाम झाला आहे. यामध्ये व्यापक विश्वासाची कमतरता, तसेच एफआयआय याच्याकडून सलगच्या विक्रीमुळे बाजाराला आपली तेजीचा कल कायम ठेवण्यात कमी पडला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.









