निफ्टी 20,000 पार : सेन्सेक्स 245 अंकांनी मजबूत
मुंबई
देशातील भारतीय शेअर बाजारात बुधवारी तिसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये पहिल्यादांच निफ्टी 20,000 च्या उंचीवर पोहोचला आहे. यामध्ये निफ्टीमधील कोल इंडिया आणि ग्रेसिम यांचे समभाग तीन टक्क्यांनी वधारले आहेत.
दिग्गज कंपन्यांमध्ये बुधवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 245.86 अंकांनी वधारुन निर्देशांक 67,466.99 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 76.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 20,070.00 वर बंद झाला आहे. या अगोदरच्या सत्रात निफ्टीने 20 हजारचा टप्पा प्राप्त केला होता, परंतु बाजार बंद होताना, हा स्तर प्राप्त केला होता. दुसरीकडे एचडीएफसी लाईफ आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग एक टक्क्यांपेक्षा अधिकने प्रभावीत झाले आहेत.
या क्षेत्रांची कामगिरी
विविध क्षेत्रांपैकी बुधवारी धातू, ऑईल अॅण्ड गॅस यांचे निर्देशांक एक टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. पीएसयू बँकेचे निर्देशांक चार टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच कॅपिटल गुड्स, वाहन आणि माहिती तंत्रज्ञान निर्देशांक तेजीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक दिवसभरात नीचांकी पातळीवरुन सकारात्मकपणे सावरल्याचे दिसून आले. तसेच स्मॉलकॅप निर्देशांक हा 0.8 टक्क्यांनी वधारला आहे.
जागतिक पातळीवरील संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात तेजीचा कल राहिला होता. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दरातील नरमाईसोबत 6.83 टक्क्यांवर राहिला आहे. इंडस्ट्रीयल उत्पादन डाटामध्ये तेजी राहिली असून भारतीय आर्थिक मजबूत स्थिती असल्याचा दाखला देत असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे. दुसरीकडे ब्रिटनमधील अर्थव्यवस्थेत घसरण आणि तेलाचे भाव वधारल्याने जागतिक बाजारात अनिश्चितता निर्माण झाल्याचेही तज्ञांनी म्हटले आहे. गुंतवणूकदार अमेरिकेतील महागाईदराच्या आकड्याची प्रतीक्षा करत आहेत. यानंतर आगामी काळात बाजाराची दिशा निश्चित होणार आहे.









