सेन्सेक्स तब्बल 67 हजारांच्या उंचीवर : निफ्टीही मजबूत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारातील बुधवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. यामध्ये सेन्सेक्स 300 तर निफ्टी 84 अंकांनी मजबूत राहिले होते. दिवसभरामध्ये एनटीपीसी, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँकेचे समभाग दोन टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत.
मागील काही दिवसांपासूनच्या देशातील व जागतिक पातळीवरील विविध घडामोडींच्या प्रभावामुळे भारतीय शेअर बाजाराचा प्रवास हा सतत सकारात्मक पातळीवर सुरु असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये तिमाही अहवाल, आरबीयाच्या रेपोदराची स्थिती व अन्य आर्थिक समीकरणे याचा प्रभाव बाजारावर असल्याचे दिसून येत आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स 302.30 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.45 टक्क्यांसोबत 67,097.44 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 83.90 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.42 टक्क्यांसोबत 19,833.15 वर स्थिरावला आहे.
या क्षेत्रांमध्ये चमक
भारतीय बाजारात प्रामुख्याने सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. यात पीएसयू बँक दोन टक्क्यांनी वधारुन बंद झाली. यामध्ये ऊर्जा, हेल्थकेअर आणि ऑईल अॅण्ड गॅस यांचा निर्देशांक 0.5 ते 0.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.6 ते 0.6 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. सेन्सेक्समध्ये बुधवारच्या सत्रात एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक म्हणजे 2.86 टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले. यामध्ये बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग वधारुन बंद झाले.
बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक, सनफार्मा, टाटा मोर्ट्स आणि आयटीसी यांचे समभाग हे एक टक्क्यांनी तेजीत राहिले. यावेळी पॉवरग्रिड कॉर्प, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक, जेएसडब्लू स्टील यांचे समभाग तेजीत होते. सेन्सेक्समध्ये टीसीएस, भारती एअरटेल, मारुती सुझुकी यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले.








