सेन्सेक्स 311 अंकांनी प्रभावीत : हिरोमोटो, झील यांचे समभाग घसरणीसह बंद
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये दिवसभरातील कामगिरीमध्ये बँकिंग क्षेत्रातील समभागांच्या विक्रीमुळे बाजारात नकारात्मक कल राहिल्याची नोंद केली आहे. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 310.88 अंकांनी वधारुन निर्देशांक 62,917.63 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 75.05 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 18,680.85 वर बंद झाला आहे. निफ्टीमधील हिरो मोटोकॉर्पचे समभाग 3.58 टक्क्यांनी घसरुन बंद झाले तसेच झीलचे समभाग 4 टक्क्यांनी तुटले आहेत. सेन्सेक्समध्ये विप्रो, इंडसइंड बँक, स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टीसीएस, एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱ्या बाजूला नेस्ले इंडिया, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयटीसी, एशियन पेन्ट्स, एचसीएल टेक , मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि सनफार्माचे समभाग वधारुन बंद झाले आहेत.
……या क्षेत्रांचे निर्देशांक
या शेअर बाजारातील क्षेत्रांमध्ये बँक क्षेत्राचे निर्देशांक हे सर्वाधिक नुकसानीत राहिले आहे. यासोबत रियलिटी निर्देशांक एक टक्क्यांनी , माहिती तंत्रज्ञान 0.5 टक्के प्रभावीत राहिले आहेत. औषध क्षेत्राचे निर्देशांक व एफएमसीजीचे निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक कल राहिल्याने देशातील शेअर बाजारात काहीसे दबावाचे वातावरण राहिले आहे. यामुळे आगामी काळात बाजाराचा कल कोणत्या दिशेने राहणार हे आताच निश्चित करणे कठिण असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
सॉव्हरन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणुकीची संधी
सॉव्हरन गोल्ड बॉण्ड या योजनेत 2023 ते 24 च्या पहिल्या आवृत्ती सोमवारी 19 जून रोजी खुली होणार आहे. यामध्ये 23 जूनपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी निर्माण होणार आहे. यामध्ये ऑनलाईन तसेच दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- नेस्ले इंडिया 22980
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1392
- आयटीसी 447
- एशियन पेन्ट्स 3294
- एचसीएल टेक 1143
- मारुती सुझुकी 9591
- बजाज फायनान्स 7128
- टेक महिंद्रा 1081
- भारती एअरटेल 829
- लार्सन अॅण्ड टुब्रो 2360
- सनफार्मा 988
- टायटन 2905
- अपोलो हॉस्पिटल 5206
- अरोबिंदो फार्मा 684
- ल्यूपिन 835
- सिप्ला 997
- सीजी कझ्युमर 292
- बीपीसीएल 378
- ब्रिटानिया 4980
- मॅरिको 544
- कोलगेट 1652
समभाग घसरलेल्या कंपन्या
- विप्रो 388
- इंडसइंड बँक 1299
- स्टेट बँक 566
- कोटक महिंद्रा 1833
- आयसीआयसीआय 926
- एचडीएफसी बँक 1581
- इन्फोसिस 1286
- टीसीएस 2116
- एचडीएफसी 2619
- टाटा मोटर्स 568
- हिंदुस्थान युनि 2689
- बजाज फिनसर्व्ह 1475
- एनटीपीसी 186
- अल्ट्राटेक सिमेंट 8336
- अॅक्सिस बँक 976
- टाटा स्टील 113
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2551
- पॉवरग्रिड कॉर्प 246
- बँक ऑफ बडोदा 183
- फेडरल बँक 122
- अंबुजा सिमेंट 458









