सलगच्या घसरणीला विराम : निफ्टी 144 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था /मुंबई
शेअर बाजारातील सलगच्या घसरणीला अखेर गुरुवारच्या सत्रात पूर्णविराम मिळाला आहे. यावेळी सेन्सेक्स जवळपास 489 अंकांनी वधारला असून निफ्टीही तेजीसह बंद झाला. गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सचे 30 मधील 28 समभाग तेजीत तर 2 घसरणीत राहिले आहेत. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग हे सर्वाधिक तेजीत राहिल्याची नोंद केली आहे. अदानी समूहाच्या अदानी पॉवरने तिमाही आकडेवारी सादर केली असून वर्षाच्या आधारे कंपनीचा नफा हा तब्बल 848 टक्क्यांनी वधारुन 6,594 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. याचा लाभ भारतीय बाजारातील कामगिरी सुधारण्यासाठी झाला असल्याचे शेअरबाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 489.57 अंकांनी वधारुन निर्देशांक 64,080.90 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 144.10 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 19,133.25 वर बंद झाला आहे. विविध कंपन्यांच्या सादर होणाऱ्या तिमाही अहवालाचा सकारात्मक परिणाम बाजारावर झाला आहे. यामध्ये अदानी समूहाच्या तिमाही निकालाचा फायदा घेत बाजार मजबूत राहिला आहे. जेपी असोसिट्स, दावत, जेके टायर यांचेही समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर घसरणीमधील कंपन्यांमध्ये सूर्या रोशनी, जीएमडीसी, कोटक बँक आणि दीपक फर्टिलायझर या समभागांचा समावेश आहे. मूल्याच्या संदर्भात कामगिरीचा आलेख पाहिल्यास यात आयडिया, जेपी पॉवर, आरइसी सुझलॉन व अदानी पॉवर या कंपन्यांचा समावेश आहे. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीज, हिंडाल्को, इंडसइंड बँक आणि अपोलो हॉस्पिटल यांचे समभाग वधारले आहेत. इतर कंपन्यांमध्ये हिरोमोटो कॉर्प, टेक महिंद्रा, बजाज ऑटो आणि बजाज फायनान्स यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक 1461
- टाटा मोर्ट्स 636
- सनफार्मा 1131
- टाटा स्टील 118
- इन्फोसिस 1370
- भारती एअरटेल 924
- पॉवरग्रिड कॉर्प 203
- अॅक्सिस बँक 982
- महिंद्रा अॅण्डमहिंद्रा 1470
- जेएसडब्लू स्टील 732
- एचसीएल टेक 1273
- एनटीपीसी 235
- नेस्ले 24125
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2319
- स्टेट बँक 571
- अल्ट्राटेक सिमेंट 8454
- टायटन 3201
- लार्सन अॅण्ड टुब्रो 2918
- टीसीएस 3359
- मारुती सुझुकी 10307
- कोटक महिंद्रा 1737
- आयटीसी 431
- विप्रो 383
- एशियन पेन्ट्स 2955
- हिंदुस्थान युनि 2489
- गेल 122
- ल्यूपिन 1171
- टाटा पॉवर 244
- ब्रिटानिया 4528
- अंबुजा सिमेंट 419
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा 1118
- बजाज फायनान्स 7452
- हिरोमोटो 3059
- बजाज ऑटो 5315
- एसबीआय कार्ड 743
- ओएनजीसी 186
- एचडीएफसी लाईफ 620
- डिव्हीस लॅब 3343
- डॉ.रेड्डीज लॅब 5334
- एलआयसी हाऊसिंग 449
- मॅक्स फायनान्स 879









