निफ्टी 19,550 वर बंद : टीसीएस, टेक महिंद्रा यांचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू सप्ताहातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात नवा विक्रम नेंदवत बीएसई सेन्सेक्सने 502 अंकांची दमदार तेजी नोंदवली आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीमध्ये आयटी, धातू, रियल्टी आणि औषध क्षेत्रात चमक राहिली होती.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 502.01 अंकांनी वधारुन निर्देशांक तब्बल 0.77 टक्क्यांसोबत 66,060.90 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 150.75 अंकांसह 0.78 टक्क्यांच्या मजबुतीसह निर्देशांक 19,564.50 वर बंद झाला आहे. यावेळी सेन्सेक्सचे 21 समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. निफ्टी निर्देशांकाने एकावेळी 19595 अकांपर्यंत झेप घेतली होती. तर सेन्सेक्सने 66159 अंकांपर्यंत मजल मारली होती.
प्रमुख कंपन्यांमध्ये वेल्सपन इंडियाचे समभाग 7.84 टक्के टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. तसेच जस्ट डायल 7.61 टक्क्यांनी मजबूत राहिला. घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये शुक्रवारी ओरिएंट इलेक्ट्रिकचे समभाग 6.76 टक्क्यांनी प्रभावीत राहिले.
टीसीएस, इन्फोसिस मजबूत
दिग्गज कंपन्यांमध्ये शुक्रवारच्या सत्रात टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, हिंडाल्को आणि आयशर मोर्ट्ससह निफ्टीमधील 50 मधील 34 समभाग तेजीत राहिले. तसेच एचडीएफसी लाईफ, पॉवर ग्रिड, डॉ. रे•ाrज, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, मारुती, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभागांसह 16 समभाग निफ्टीत घसरणीत राहिले.
आयटी कंपन्या तेजीत
एनएसई निफ्टीमधील सर्व 11 क्षेत्रांमध्ये तेजी राहिली होती. आयटी क्षेत्र सर्वाधिक म्हणजे 4.45 टक्क्यांनी वधारले आहे. यासोबतच धातू, रियल्टी क्षेत्रतही वधारले आहे. तसेच बँक, वाहन, आर्थिक सर्व्हिस, एफएमसीजी, औषध, पीयूसी बँक आणि खासगी बँक यांच्या क्षेत्रातही शुक्रवारी चमक राहिली आहे. आगामी काळात तिमाही अहवाल सादर करण्यात येणार आहेत.









