इन्फोसिस समभाग तेजीत : अमेरिका व आशियाई बाजारात तेजी
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी पुन्हा एकदा घसरणीनंतर सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक सावरल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थिती निवळल्यानंतर भारतीय बाजार भक्कमपणे सावरत बंद झाला. यामध्ये एचडीएफसी बँक व इन्फोसिस यांचे समभाग तेजीत होते तर जगभरातील अमेरिका व आशियामधील बाजारांमध्ये तेजी राहिल्याचा लाभ हा सेन्सेक्स व निफ्टी यांना झाला. दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर बाजारात चढउतार राहिल्यानंतर अंतिम क्षणी बीएसई 676.69 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 73,663.72 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 203.30 अंकांनी वधारुन निर्देशांक 22,403.85 वर बंद झाला आहे.
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये सकारात्मक स्थिती राहिल्याच्या कारणास्तव भारतीय बाजारात तेजीचे वातावरण राहिले. दरम्यान अमेरिकेकडून चलनदर वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत असल्याने हे पाहता 2024 मध्ये व्याजदर कपातीची शक्यता अधिक बळावली आहे. यामुळे जागतिक आर्थिक अनिश्चितेतच्या काळात बँकिंग, आयटी व उद्योग या क्षेत्रातील दिग्गज समभागांनी चमकदार कामगिरी केल्याने बाजारात तेजी राहिली. मुख्य कंपन्यांमध्ये महिंद्रा आणि महिंद्रा, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, टायटन, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग नफा कमाईत राहिले. तर अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, भारतीय स्टेट बँक, पॉवरग्रिड कॉर्प, टाटा मोर्ट्स आणि इंडसइंड बँक यांचे निर्देशांक नुकसानीत राहिले.
जागतिक संकेत
जागतिक बाजारांमध्ये आशियातील बाजारात सियोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँग हे बाजार नफा कमाईत राहिले आहेत तर युरोपीयन बाजारात घसरण राहिली होती.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- महिंद्रा आणि महिंद्रा 2371
- भारती एअरटेल 1345
- एलटीआय माइंंट्री 4771
- टेक महिंद्रा 1307
- इन्फोसिस 1453
- एचडीएफसी लाइफ 567
- टायटन 3333
- जेएसडब्ल्यू स्टील 886
- बजाज फिनसर्व्ह 1596
- हिरोमोटो कॉर्प 5141
- एसबीआय लाइफ 1452
- ओएनजीसी 277
- एचडीएफसी बँक 1460
- ब्रिटानिया 5137
- लार्सन टुब्रो 3460
- अपोलो हॉस्पिटल 5931
- विप्रो 464
- कोटक महिंद्रा 1672
- एचसीएल टेक 1348
- सिप्ला 1421
- बजाज फायनान्स 6747
- अॅक्सिस बँक 1139
- अल्ट्राटेक सिमेंट 9709
- एचयुएल 2343
- आयटीसी 431
- रिलायन्स 2850
- आयसीआयसीआय 1131
- सन फार्मा 1536
- अदानी पोर्टस् 1345
- टीसीएस 3900
- टाटा स्टील 165
- नेस्ले 2468
- कोल इंडिया 468
- एनटीपीसी 361
समभाग घसरलेल्या कंपन्या
- मारुती सुझुकी 12497
- टाटा मोटर्स 936
- एसबीआय 811
- बीपीसीएल 618
- पॉवरग्रिड कॉर्प 312
- इंडसइंड बँक 1408
- डॉ. रेड्डीज लॅब 5850









