निफ्टी 83 अंकांनी तेजीत : वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक चमक
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारामध्ये मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई सेन्सेक्स यांच्या समभागांमधील कामगिरीच्या मदतीने 273 अंकांनी वधारुन बंद झाल्या आहेत. तसेच दिवसभरामध्ये वाहन व अन्य क्षेत्रातील कामगिरीमुळे बाजार सावरला आहे. यामध्ये 30 मधील सेन्सेक्समधील 19 समभाग तेजीत तर 11 समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 273.67 अंकांनी वधारुन 0.42 टक्क्यांसोबत निर्देशांक 65,617.84 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 83.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 19,439.40 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये आयशर मोर्ट्स, सनफार्मा, टाटा कंझ्युमर, अपोलो हॉस्पिटल, मारुती सुझुकी, टाटा मोर्ट्स, आयटीसीसह निफ्टीमधील 50 पैकी 33 समभाग हे तेजीसह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँक, एचसीएल टेक, स्टेट बँक, एचडीएफसी , बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि टाटा स्टील याचा घसरणीत समावेश राहिला आहे.
वाहन क्षेत्राची कामगिरी
एनएसईमधील 11 क्षेत्रांमध्ये सहा निर्देशांकांने तेजी आणि 5 मध्ये घसरण दिसून आली. तसेच यावेळी सकारात्मक कामगिरीत वाहन क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 1.39 टक्क्यांची मजबूत स्थिती राहिली होती. तर एफएमसीजी आणि औषध क्षेत्र 1 टक्क्यांनी वधारले. तसेच आयटी, मीडिया आणि खासगी बँक या तेजीत होत्या. अन्य कंपन्यांपैकी बँक, फायनाशिअल सर्व्हिस, धातू, पीएसयू बँक आणि रियल्टी क्षेत्र घसरणीत राहिले.
रुपया मजबूत
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी मजबूत होत 82.36 वर बंद झाली. मागील सत्रात रुपया 82.57 चा टप्पा पार केला होता.









