निफ्टी 19,800 च्या खाली सरकला : तिमाही अहवाला अगोदरच इन्फोसिस, एचसीएल टेक नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे बाजाराची सुरुवात तेजीमध्ये झाली परंतु अंतिम क्षणी मात्र बाजारात घसरणीचा कल राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 64.66 अंकांनी घसरुन निर्देशांक 0.097 टक्क्यांवर प्रभावीत होत 66,408.39वर बंद झाला. यांच्या विरुद्ध बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 17.35 अंकांनी घसरुन निर्देशांक 19,794.00 वर बंद झाला आहे. मुख्य क्षेत्रांची स्थिती पाहिल्यास यामध्ये आयटी, एफएमसीजी या क्षेत्रात घसरण राहिली आहे. तर निफ्टी बँक, निफ्टी मिडकॅप, निफ्टी वाहन आणि औषध यांचे निर्देशांक तेजीत राहिले होते.
गुरुवारच्या सत्रात जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये जपान, चीन आणि हाँगकाँगसह आशियाई बाजारात तेजी राहिली होती. सकाळच्या सत्रात भारतीय बाजाराची सुरुवात मजबूत झाली होती, परंतु अंतिम क्षणी मात्र तेजी कायम ठेवण्यास बाजाराला अपयश आले. सेन्सेक्समधील 16 समभाग हे वधारले असून यामध्ये इंडसइंड बँक, टाटा मोर्ट्स , जेएसडब्लू स्टील, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, टाटा स्टील आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग प्रारंभीच्या दरम्यान तेजीत राहिले होते. तर 14 समभाग हे प्रभावीत होत बंद झाले. आयटीमधील टीसीएस कंपनीचे समभाग हे 1 टक्क्यांपेक्षा अधिकने नुकसानीत राहिले.
तिमाही निकालांवर बाजाराची नजर
सप्टेंबर तिमाहीचे निकाल सादर होणार असल्याने बहुतांश गुंतवणूकदारांच्या नजरा या शेअर बाजारातील कामगिरीकडे लागून राहिल्या आहेत. यामुळे आगामी काळात बाजार काय कल प्राप्त करणार हे पहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- बीपीसीएल 348
- कोल इंडिया 307
- मारुती सुझुकी 10580
- एनटीपीसी 241
- पॉवरग्रिड कॉर्प 200
- ग्रासिम 2001
- बजाज ऑटो 5106
- जेएसडब्ल्यू स्टील 783
- टाटा स्टील 125
- अदानी एंटरप्रायझेस 2506
- एचडीएफसी बँक 1549
- महिंद्रा आणि महिंद्रा 1566
- ओएनजीसी 184
- आयटीसी 450
- एचडीएफसी लाइफ 624
- टाटा मोटर्स 636
- एसबीआय लाइफ 1313
- आयशर मोटर्स 3494
- इंडसइंड बँक 1424
- रिलायन्स 2349
- सन फार्मा 1130
- टायटन 3285
- ब्रिटानिया 4560
- डिव्हीस लॅब्ज 3755
- आयसीआयसीआय 954
- हिंडाल्को 484
- अल्ट्राटेक सिमेंट 8531
- एचयुएल 2557
- अदानी पोर्ट्स 823
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा 1198
- अपोलो हॉस्पिटल 4993
- इन्फोसिस 1465
- टीसीएस 3542
- एचसीएल टेक 1223
- एलटीआय माइंडट्री 5154
- सिप्ला 1157
- युपीएल 620
- बजाज फायनान्स 8014
- विप्रो 417
- डॉ. रे•िज लॅब्ज 5530
- भारती एअरटेल 950









