वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारात मिळता-जुळता कल राहिल्याच्या कारणास्तव भारतीय भांडवली बाजारात अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स प्रभावीत होत 123 अंकांनी घसरणीसह बंद झाला आहे. यावेळी निफ्टीही 17,850 च्या जवळपास कार्यरत राहिला होता.
यावेळी अदानी समूहातील समभागांमध्ये गुरुवारी व शुक्रवारीही घसरण दिसून आली आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये पेटीएमचे समभाग हे 9 टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून रिलायन्स, एचसीएल, टाटा स्टील यांचेही समभाग घसरणीत होते तर बँकिंग क्षेत्र तेजीसह बंद झाले आहे.
चढ उताराच्या व्यवहारांमध्ये भारतीय बाजार शुक्रवारी घसरणीत राहिला आहे. कारण अमेरिकेत मंदी सदृश्य स्थिती राहणार असल्याच्या कारणास्तव जागतिक इक्विटीमध्ये प्रभावीत राहिली आहे. सेन्सेक्स दिवसअखेर 123.52 अंकांनी घसरुन निर्देशांक 60,682.70 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36.95 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,856.50 वर बंद झाला आहे.
अमेरिकेतील वाढती विकासाची चिंता यामुळे माहिती तंत्रज्ञान व धातू क्षेत्रात 0.8 टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण झाली आहे. यासह 13 प्रमुख क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. पेटीएमचे समभाग 7.82 टक्क्यांच्या नुकसानीसह बंद झाले आहेत.
अदानी समूहातील समभागात मागील काही दिवसांसह सप्ताहातील अंतिम सत्रात नकारात्मक कामगिरी राहिली आहे. यात अदानी एंटरप्राईजेसचे समभाग 3.78 टक्के, अदानी टोटल गॅस 5 टक्के, अदानी ग्रीन व अदानी ट्रान्समिशनमध्ये 5 , 5 टक्क्यांची घसरण राहिली आहे. यामुळे समूहातील 10 मधील 9 समभाग प्रभावीत राहिले आहेत.
बँकिंगसह हे समभाग तेजीत
बँकिंग क्षेत्रातील समभागात तेजी नोंदवण्यात आली आहे. यासह सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे समभाग 2 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत.









