दिवसभर चढउतारांची मालिका : धातू, ऊर्जा निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेन्समध्ये 29 अंकांची घसरण तर दुसऱ्या बाजूला निफ्टीचा निर्देशांक मात्र काहीशा तेजीसोबत बंद झाला आहे. मंगळवारी काही निवडक कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग हे सर्वाधिक घसरणीत राहिले आहेत.
दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 29.07 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 66,355.71 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 8.25 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.04 टक्क्यांच्या हलक्या तेजीसोबत 19,680.60 वर बंद झाला आहे. निफ्टीमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग हे सर्वाधिक 4.20 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. तसेच हिंडाल्कोचे समभाग हे सर्वाधिक वधारले आहेत.
बीएसई सेन्सेक्समध्ये आयटीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, स्टेट बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, विप्रो, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल आणि नेस्ले इंडियाचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत.
सेन्सेक्समध्ये जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग सर्वाधिक 3.33 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. यासह एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोर्ट्स, टायटन, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स आणि टीसीएसचे समभाग वधारुन बंद झाले.
मंगळवारी मुख्य क्षेत्रांची स्थिती पाहिल्यास यामध्ये धातू आणि ऊर्जा यांचे निर्देशांक प्रत्येकी 2 टक्क्यांनी वधारले आहेत. यामध्ये पीएसयू बँक, कॅपिटल, एफएमसीजी आणि रियल इस्टेट यांचे निर्देशांक 0.5-1 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. बीएसईत मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांक जवळपास 0.4 टक्क्यांनी वधारले आहेत.
रुपया घसरला
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया काहीशी घसरण नोंदवत 81.87 पातळीवर बंद झाला. मागील सत्रात रुपया 81.82 पातळीवर बंद झाला आहे.
फेडरल रिझर्व्हचा व्याजदरसंबंधीचा निर्णय सादर करण्याअगोदर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून मंगळवारी भारतीय शेअर बाजारात घसरणीची नोंद करण्यात आली. दुसरीकडे चीनमधील रियल इस्टेट क्षेत्राला पॉलीसी सपोर्ट उपलब्ध करण्यासाठी चीन सरकार कटिबद्ध असल्याने त्याचा प्रभाव धातू क्षेत्रावर राहिल्याचे दिसून आले.









