नवी दिल्ली :
दागिन्यांच्या व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या सेंको गोल्ड यांचा आयपीओ शेअर बाजारात बुधवारी खुला झाला असून गुंतवणूकदारांना 6 जुलैपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. सदरच्या कंपनीचे समभाग 14 जुलै रोजी बीएसई व एनएसईवर लिस्ट होणार आहेत. प्रारंभीक सार्वजनिक प्रस्तावाच्या (आयपीओ) माध्यमातून 405 कोटी कंपनी आगामी काळामध्ये उभारणार आहे. आयपीओ अंतर्गत 270 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग सादर करण्याचे ठरविले असून प्रवर्तक 135 कोटी रुपयांचे समभाग विक्री करणार आहे.









