बेळगाव : जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सुरू केलेल्या ‘फोन ईन’ कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या व जिल्हाधिकारी नितेश पाटील हेही भाग घेणार आहेत. शनिवार दि. 10 जून रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत ‘फोन ईन’ कार्यक्रम होणार आहे. निवडणुकीचा बंदोबस्त असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दडपण असो, पोलीसप्रमुखांनी ‘फोन ईन’ कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. शनिवारी होणारा हा कार्यक्रम 13 वा असून जिल्ह्यातील तीन प्रमुख अधिकारी तब्बल दोन तास नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आता जिल्हाधिकारीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पोलीस दलासंबंधीची कामे, नागरिकांच्या समस्यांबरोबरच आता महसूल, भूमापन, नगरपालिका आदी शासकीय खात्यांच्या कारभाराविषयी नागरिकांना प्रश्न विचारता येणार आहेत. पोलीस आयुक्त सहभागी होणार असल्यामुळे शहराच्या प्रश्नांवरही उत्तरे मिळणार आहेत. जिल्हा पोलीसप्रमुखांनी दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी पहिला ‘फोन ईन’ कार्यक्रम घेतला. त्यावेळी पहिल्या दिवशी 72 जणांनी पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून आपले गाऱ्हाणे मांडले. 26 मे रोजी बारावा ‘फोन ईन’ कार्यक्रम झाला असून आतापयर्तिं 727 जणांनी या कार्यक्रमात भाग घेऊन आपल्या तक्रारी मांडल्या आहेत. बहुतेक तक्रारींची दखल घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
लोकाभिमुख उपक्रमाचे कौतुक
केवळ बेळगाव जिल्हाच नव्हे तर बेळगाव शहर व इतर जिल्ह्यांतूनही नागरिकांनी पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम लोकप्रिय बनत चालला असून पोलीसप्रमुखांनी सुरू केलेल्या लोकाभिमुख उपक्रमाचे संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे.
या क्रमांकावर समस्या मांडण्याची संधी
पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख तिन्ही प्रमुख अधिकारी शनिवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत 0831-2405226 या क्रमांकावर नागरिकांच्या समस्या ऐकणार आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, गुन्हेगारी, बेकायदा कारवाया आदींबरोबरच महसूल विभागाचे अधिकारी नियमितपणे ग्रामीण भागात भेटी देतात का? स्थानिक कार्यालयात वेळेत अजर्चीं दखल घेतली जाते का? सर्व्हेयरसंबंधी तक्रारी आहेत का? महसूल विभागाचे अधिकारी किंवा नगरपालिकेसंबंधींच्या तक्रारी आहेत का? असतील तर त्या या कार्यक्रमात मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.