प्रतिनिधी,कोल्हापूर
काटा तपासणीसाठी येणारे अधिकारी हे दिवसा येतात.पण महाडीकांचा काटामारीचा खेळ रात्री बारानंतर सुरु होतो.त्यामुळे काटा कोण तपासणार आणि बक्षीस कोणाला देणार हे माजी आमदार अमल महाडिक यांनी जाहीर करावे,असे आव्हान कारखान्याचे ज्येष्ठ सभासद शामराव चौगले यांनी दिले.राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने सोन्याची शिरोली येथे झालेल्या सभासद संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौगले म्हणाले,आजपर्यंत महाडिकांनी कोट्यावधी रुपये लुटले आणि लाखाचे बक्षीस द्यायची भाषा बोलत आहेत. आमच्या भागातील उसाला भोगावती कारखान्यात जास्त रिकव्हरी मिळते.मात्र हाच ऊस राजारामला आणल्यावर दीडने रिकव्हरी कमी कशी होते. जिह्यातील इतर कारखान्याचे दर वाढत असताना राजारामचा दर कमी कसा होतो.आजपर्यंत शेतकऱ्यांना कोट्यावधीला लुटणाऱ्या महाडिकांनी या निवडणुकीत पोराला पुढं केलय.पण सभासद मात्र महाडीकांचा कावा ओळखून आहेत.आता सभासदच त्यांना धडा शिकवतील,असा इशारा चौगले यांनी दिला.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, राजाराम कारखान्याच्या सभासदांच्या मनात सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे. सभासदांना न्याय देण्यासाठी ही लढाई आहे.हा कारखाना सभासदांच्या मालकीचा असून तो सहकारीच रहावा यासाठीचा हा लढा आहे.सभासदांनीच आता कारखान्यात परिवर्तन घडवण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले. राजाराम निउंगरे यांनी छत्रपती राजाराम साखर कारखान्यातील अन्यायी कारभाराचा पाढा वाचला.भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील,बाजीराव चौगले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी हरीअण्णा चौगले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग भांदीगरे,आर .के. मोरे, मोहन पाटील, आर .डी.निऊंगरे,राजेंद्र मोरे,ज्ञानदेव पाटील,संजय माळकर,दिगंबर मेडसिंगे,राजू पाटील,जीवन पाटील,मोहन कांबळे,दिनकर पाटील,संजय पारकर,शांताराम पाटील,शिवाजी पाटील,अजित पाटील,बाबूराव चौगले,जीवबा कांबळे,दत्तात्रय पाटील,बाजीराव चौगले,चंद्रकांत चौगले आदी उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









