सावंतवाडी : प्रतिनिधी
श्रीराम वाचन मंदिरतर्फे जेष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक निळू दामले यांचे व्याख्यान मंगळवार ५ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ‘इस्त्राईल पॅलेस्टाईन : न संपणारा संघर्ष’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. निळू दामले हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक असून देशोदेशीच्या पत्रकारितेवर त्यांनी अनेक ग्रंथातून लिखाण केले आहे. सकस आणि सखोल, साधार आणि सडेतोड, सुसाट जॉर्ज, माणूस आणि झाड, जेरुसलेम, लवासा, पाकिस्तानची घसरण, सीरिया : सगळे विरुद्ध सगळे, दुष्काळ सुकाळ अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर आणि सचिव रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









