मडगाव : ज्येष्ठ पत्रकार आणि मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकी फालेरो (वय 71) यांचे काल गुऊवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. इतिहास संशोधक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्च्यात पत्नी श्रीमती डेझी या आहेत. गुऊवारी दुपारी घरातच असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वाल्मिकींच्या निधनावर साहित्यिक तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी दु:ख व्यक्त केले आहे. वाल्मिकी फालेरो यांची अभ्यासू आणि धडाडीचे पत्रकार अशी ओळख होती. मडगाव पालिका निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 1985 ते 1987 या कालावधीत त्यांनी मडगावचे नगराध्यक्षपदही भूषविले होते. ‘इंडियन एक्सप्रेस’साठी गोव्याचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतानाच त्यांनी ‘द इलेस्टेटेड विकली’, ‘करंट विकली’, ‘मिरर’ या सारख्या राष्ट्रीय वृत्तपत्रांतही काम केले होते. गोव्यात त्यावेळी सुरू केलेल्या ‘द वेस्ट कोस्ट टाईम्स’ या दैनिकात त्यांनी मुख्य प्रतिनिधी म्हणून काही काळासाठी काम केले होते. लोकांच्या प्रŽांना वाचा फोडणारे पत्रकार अशी त्यांची प्रतिमा त्यावेळी बनली होती. राजभाषा आंदोलनातही त्यांनी सक्रिय भाग घेतला होता.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वाल्मिकी फालेरो यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलेय की, अभिमानी गोंयकार, इतिहासकार, लेखक आणि मडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकी फालेरो यांच्या निधनाने धक्का बसला व दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, असे ते म्हणाले. वाल्मिकी फालेरो यांनी गोव्याचे अनेक विषय आपल्या लेखणीतून मांडले असे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. दक्षिण गोव्याचे माजी खा. अॅड. नरेंद्र सावईकर तसेच माजी आमदार अॅड. राधाराव ग्रासियश, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, समाजकार्यकर्ते विवेक नाईक, माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो तसेच इतरांनी फालेरो यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.









