विनर्स संघाकडून स्नेहमेळाव्याचे आयोजन : आनंददायी वातावरणात संपन्न
बेळगाव : बेळगावच्या क्रिकेट क्षेत्रातील 1980 ते 2002 च्या दशकातील जेष्ठ नावाजलेले क्रिकेटपटूंचा स्नेहमेळावा विनर्स संघाचे जेष्ठ खेळाडू आनंद कुलकर्णी यांनी आयोजित केला होता. यावेळी जुन्या खेळाडूंच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यात 1980 ते 2002 च्या दशकात बेळगावतील ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी विविध संघातून खेळताना नावलौकिक मिळविले होते. या खेळाडूं निवृत्तीनंतर आजतागायत हे सर्व खेळाडू एकत्र आले नव्हते. याची दखल विनर्स संघटनेने घेतली. त्यानुसार विनर्स संघाचे सुनील महाजन, रवी कणबर्गी, आनंद कुलकर्णी, रणजीत पाटील, शिवाजी पार्क संघाचे रमेश गोजवानी, प्रेमानंद भोसले, मराठा स्पोर्ट्सचे प्रमोद पवार, रतन आप्पण्णवर, बसवराज तेलसंग, अजित भोसले, गोगो स्पोर्ट्सचे उदय मोटार, असा संघाचे मदन शेट्टी, आरिफ मिस्त्री, केजीबी स्पोर्ट्सचे राजू बडवाण्णाचे, इंडाल क्लबचे वीरेश गौडर, शाहीनचे नासिर पठाण हे सर्व खेळाडू एकत्रित आले. प्रारंभी या सर्व खेळाडूंचे स्वागत आनंद कुलकर्णी यांनी करून या मेळाव्याचा हेतू सांगितला. हे सर्व खेळाडू आपापल्या काळात टेनिस बॉल व लेदर क्रिकेट बॉल मध्ये नावारूपाला आले होते. त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. पण सध्या आपल्या व्यवसायानिमित्त हे सर्व अलिप्त राहत होते. या सर्व ज्येष्ठ क्रिकेटपटूंना एकत्र आणून जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या.









